फिंगरप्रिंट डेव्हलपमेंट
मागील भागामध्ये आपण फिंगरप्रिंटचे टाईप कोणकोणते आहेत ते पाहिलं आणि त्याबद्दल सविस्तर माहिती घेतली . आज आपण पाहूया की एखाद्या गुन्ह्याच्या स्थळी आपणाला फिंगरप्रिंट कसे मिळवायचे ? ते फिंगरप्रिंट आपल्याला कसे उपयोगी पडतील ? त्या फिंगरप्रिंटचा वापर करून आपण एखाद्या गुन्हेगाराला कसे पकडू शकतो ? गुण्याच्या स्थळे असलेले फिंगरप्रिंट डोळ्याला दिसत नाहीत , तर ते कसे डेव्हलप करायचे ते कसे मिळवायचे ? या सर्व गोष्टीबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. उदाहरणार्थ समजा एखाद्या घरी चोरी झालेली आहे. त्या घरातील सोने - चांदी आणि मौल्यवान वस्तू चोरीला गेलेले आहेत. तर सुरुवातीला पोलीस ऑफिसर किंवा एखादे फॉरेन्सिक एक्सपोर्ट जे फिंगरप्रिंट तज्ञ असतात. हे सुरुवातीला दरवाजा जवळ असलेल्या कडी जवळ फिंगरप्रिंट डेव्हलप करायचा प्रयत्न करतात. फिंगरप्रिंट डेव्हलप करायला आपल्याकडे दोन मेथड्स आहेत एक आहे पावडर मेथड आणि दुसरी आहे केमिकल मेथड. तर तेथे पावडर मेथड वापरते आणि ...