SEXTORTION ऑनलाइन ब्लॅकमेलचा बळी (DRUSHTI FORENSIC LAB)
SEXTORTION
VICTIM OF ONLINE BLACKMAIL.
( ऑनलाइन ब्लॅकमेलचा बळी )
तर आपल्या देशामध्ये लोक वेगवेगळ्या प्रकारे ऑनलाईन काम करतात कोणी व्यवसाय करतो, ऑनलाईन कोणी टीचिंग देत म्हणजे शैक्षणिक सुविधा देतात. आपण ऑनलाइन बँकिंग वगैरे वापरतो तसेच आपल्याकडे ऑनलाइन असलेले फेसबुक मेसेंजर, इंस्टाग्राम, ट्विटर ऑनलाईन गेम प्लॅटफॉर्म ऑनलाइन डेटिंग प्लॅटफॉर्म असे वेगवेगळे आपल्याकडे सॉफ्टवेअर किंवा एप्लीकेशन यामध्ये लोक वेगवेगळ्या विभागांमध्ये किती परसेंटेज आहेत ते आपण पाहूया.
आता हे सेक्सटोरेशन कसं होतं ते पाहूया
1. MESSAGING APP (मेसेंजर ॲप) :- यावरून आपल्याला एखादा मेसेज येतो तो ऑनलाइन किंवा एखादा व्हिडिओ कॉल येतो. मग या दोन्हीला आपण उत्तर देतो म्हणजे त्या मेसेजला पण रिप्लाय देतो किंवा त्याविषयी आपण व्हिडिओ कॉल रिसिव्ह करतो. ज्यावेळी आपण व्हिडिओ कॉल रिसिव्ह करतो त्यावेळी त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं. आणि त्यानंतर तुम्हाला ब्लॅकमेल केला जातो. की तुम्ही पैसे वगैरे द्या.
2. DATING APP (डेटिंग ॲप):- यावर आपल्याला आपण दुसऱ्या व्यक्तीबरोबर फ्रेंडशिप करतो. त्याच्याशी आपलं चॅटिंग होतं. त्यामध्ये सुद्धा आपण व्हिडिओ कॉल वगैरे करतो आणि तेच व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग करून आपल्याला ब्लॅकमेलिंग केलं जातं.
3. SOCIAL MEDIA (सोशल मीडिया):- याच्यावर आपल्याला वेगवेगळ्या लोकांचे फ्रेंड रिक्वेस्ट ते आपण एक्सेप्ट करतो. त्याच्यावर आपल्या दोघांचं चॅटिंग वगैरे होतं त्या चॅटिंग मध्ये तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ दाखवले जातात किंवा एखादी लिंक पाठवले जातात त्या लिंक वर तुम्ही जाता तिथे तुमचे रेकॉर्डिंग केलं जातं आणि त्याच्यावर तुम्हाला ब्लॅकमेलिंग केलं जातं.
4. ADULT SIDE (अडल्ट साईट):- यामध्ये सुद्धा तुम्हाला एखादी लिंक पाठवले जाते आणि त्या लिंक वरून तुमचं सर्व काही रेकॉर्डिंग करून तुम्हाला ब्लॅकमेलिंग केलं जातं.
हे जे सर्व आहे हे त्या क्राईमचा किंवा त्या गुन्ह्याचा एक मार्ग आहे, म्हणजे MODUS OPERANDI आहे. आता हे क्राईम पहिला मोठमोठ्या सिटीमध्ये होत होते मोठमोठ्या लोकांच्या बरोबर होत होते. पण आता तर हे पूर्ण गावागावांमध्ये गेलेल्या पूर्ण गावातल्या लोकांना किंवा एखाद्या मुलांना त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. त्यावरती मुले लहान मुले असू द्या किंवा आता कॉलेजला असलेले मुले ते फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करतात. त्यांच्याबरोबर ते चॅटिंग वगैरे करतात आणि नको त्या वस्तू ते करून त्यांचे ते व्हिडिओ बनवले जातात. ते व्हिडिओ तुम्हालाच पाठवले जातात. तुमच्या व्हाट्सअप नंबर वर तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही एक तर पैसे द्या नाहीतर हे व्हिडिओ आम्ही तुम्हाला तुमच्या परिवारांना किंवा तुमच्या मित्रांना आम्ही पाठवू . हा एक प्रकारचा क्राईम नवीन प्रकारे शोधून काढलेल्या त्यालाच सेक्सट्रॉशनअसे म्हटले जाते. हे क्राईम होतो कसा हे आपण पाहूया.
एखादा सायबर फ्रॉड तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो. ती फ्रेंड रिक्वेस्ट आपल्याला फेसबुक वर इंस्टाग्राम वर येते ती आपण एक्सेप्ट करतो त्यानंतर दोघांचे हाय-हॅलो असे चॅटिंग वगैरे चालू होतात. त्यानंतर तुमचा व्हाट्सअप नंबर मागितला जातो तो तुम्ही व्हाट्सअप नंबर त्यांना देता त्या व्हाट्सअप वर तुमचं मग चॅटिंग होतं. चॅटिंग होत असतानाच तुम्हाला नको ते व्हिडिओ दाखवले जातात त्यानंतर तुम्ही उत्तेजित होता आणि त्यानंतर त्यांना ते जसे सांगतील तसे तुम्ही त्यांच्याबरोबर करायला सुरुवात करतात. हे सगळे करत असताना तुमचा व्हिडिओ ते रेकॉर्डिंग केले जातात. त्याचबरोबर ते तुमच्या फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्यानंतर तुमचे जे फ्रेंड्स आहेत जे तुमच्या फोटोज वर किंवा तुमच्या व्हिडिओ जर लाईक कमेंट टाकत असतात. त्यांच्याशी सुद्धा ते संलग्न होतात त्यानंतर तुमचा जो व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. तो व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवलं जातं आणि ते व्हिडिओ बघून तुम्हाला खूप भीती वाटते. कारण त्यामध्ये आपण नको त्या अवस्थेत असतो किंवा नको त्या पोझिशनमध्ये पण असतो त्यानंतर तोच व्हिडिओ तुमच्या फॅमिली मेंबर पाठवू किंवा तुमच्या नातेवाईकाला पाठवू किंवा तुमच्या मित्रांना पाठवू अशी ती तुम्हाला धमकी देतात व तेथे तुम्हाला ते ब्लॅकमेलिंग करतात. तेथेच तुम्ही त्यांना पैसे देता त्यांची पैशाची डिमांड ही छोटी असते हजार पंधराशे रुपये पर्यंत ते मागतात पण ही त्यांची डिमांड कधीही थांबत नाही ते तुम्हाला मागतच राहतात आणि तुम्ही त्यांना देत राहता. आपल्या सोसायटीमध्ये काही काही लोकांनी तर त्यांना एक लाख ते दोन लाख रुपये रक्कम सुद्धा दिलेले आहे. हे तुम्ही पेपरामध्ये सुद्धा वाचला असाल पण त्यांची डिमांड काय थांबत नाही किंवा तुमची स्क्रीन शॉट त्यांना पाठवू तुम्ही पैसे नाही दिला तर असे ते तुम्हाला सांगतात.
तुम्हाला ब्लॅकमेलिंग करतात समजा तुम्ही त्यांना पैसे दिला तर त्यानंतर तुम्हाला लगेच एक अन दोन कॉल येतो तो कॉल वाला व्यक्ति बोलतो की मी YOU TUBE चा मॅनेजर बोलत आहे. आम्हाला तुमचा एक व्हिडिओ आलेला आहे हा व्हिडिओ आम्ही अपलोड करणार आहोत .जर तुम्ही पैसे दिला तर तो आम्ही थांबू नाहीतर आम्ही अपलोड करू असे ते सांगतात. मग आपण लगेच आपली सायकॉलॉजी काम करायला चालू होते, की जर युट्युब वर आला तर सगळ्या जगाला कळेल मग त्यामुळे तुम्ही त्यांना सुद्धा पैसे देता.
त्यानंतर लगेच तुम्हाला एक कॉल येतो किंवा एक मेसेज येतो की मी पोलीस बोलत आहे. आम्हाला तुमच्या विरुद्ध एक व्हिडिओ मिळालेला आहे तो व्हिडिओ आम्ही बनवून तुमच्या घरी पाठवून तुमच्यावर आम्ही केस बनवू असे ते सांगतात. त्याच्या त्या तिथे सुद्धा तुमच्याकडून पैशाची डिमांड केली जाते. पण हे सर्व काही करण्याचा उद्देश त्यांचा हा पैशाचा असतो म्हणजे तुम्हाला ते पैसे मागून घेतात, पण ते कुठेही थांबत नाहीत किंवा ते तुमचा व्हिडिओ स्क्रीन शॉट डिलीट करत नाहीत ते तुम्हाला असेच वारंवार पैसे मागत राहतात. असेच तुम्हाला कॉल किंवा ऑनलाईन मेसेज येतच राहतात असंच सेम डेटिंग ॲप मेसेंजर आणि अडल्ट साइटवर होतो.
तुम्ही एकदा काय त्यांना पैसे दिला तर तुम्ही त्या दलदलीमध्ये अडकून राहता त्या दलदलीतन तुम्ही निघू शकत नाही. तुम्हाला ते वारंवार दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी 25 दिवसांनी किंवा महिन्यांनी ते ब्लॅकमेलिंग हे करतच राहतात. तुम्ही त्यांना पैसे पाठवत राहतात पण येते आपण चूक एवढी करतो की त्यांना पैसे पाठवतो पण पैसे पाठवून झाल्यावर आपल्याकडे असलेले व्हिडिओस आपल्याकडे असलेले ते व्हिडिओ रेकॉर्डिंग आपल्याकडे असलेल्या चॅटिंग आपल्याकडे असलेले ते अकाउंट आपण वापरत असलेले फेसबुक इंस्टाग्राम चा अकाउंट आपण सर्व काही डिलीट मारून तर टाकतो किंवा त्याचा पासवर्ड वगैरे पण चेंज करतो. ती व्यक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही कारण त्या व्यक्तीकडे तुमचा मोबाईल नंबर असतो तुमचा व्हाट्सअप नंबर असतो. तर ते व्हाट्सअप वर तुम्हाला मेसेज करायला चालू करतात. एवढं सगळं झालं की तुम्ही त्या दलदलीत एवढे अडकता की तुम्ही आर्थिक दृष्ट्या खूप कमकुवत बनता. मग तुम्ही पोलिसांची मदत घ्यायला बघता मग तुम्ही पोलिसांच्या कडे जाता पोलिसांना ही सगळी स्टोरी सांगता पोलीस सगळे ऐकून घेतात आणि नंतर तुम्ही त्यांना म्हणता की माझ्याकडे काही व्हिडिओ नाही मी सर्व काही डिलीट मारून टाकलेला आहे. तर मग तुम्हाला तेथे पोलीस सुद्धा काहीही मदत करू शकत नाहीत कारण पोलीस कोणत्याही व्हिडिओ शिवाय ते काम करत नाहीत.
या पूर्ण क्राईमला 'सीन ऑफ सोसायटी' असे म्हणतात कारण तुम्ही सोसायटीला सुद्धा सांगू शकत नाही की माझ्याबरोबर काय झालेला झालेला आहे इव्हन किंवा तुम्ही तुमच्या आई-वडिलांना किंवा तुमच्या बायकोला सुद्धा तुम्ही सांगू शकत नाही. तुमच्या बरोबर काय झालेला आहे हे सर्व काही तुमच्याबरोबर होतं त्यावेळी तुम्ही आर्थिक दृष्ट्या त्यांना खूप पैसे दिलेला असता. कमीत कमी AMOUNT लाखात सुद्धा असते आणि जाते. तुम्हाला जे युट्युब वाले मेसेज करत आहेत किंवा जे युट्युब वाला कॉल करत आहे की मी YouTube चा मॅनेजर बोलत आहे किंवा मी पोलीस ऑफिसर बोलत आहे तर आपण तेथे या दोघांची सुद्धा माहिती घेत नाही की हे दोघं खरोखरच बरोबर व्यक्ती आहे का किंवा जी युट्युब मॅनेजर मला फोन करत आहे ते अकाउंट जे दाखवत आहेत त्या अकाउंट खरोखरच खर आहे किंवा खोटा आहे. हे आपण बघत नाही त्याचबरोबर आपण जो पोलिस वाला आहे की पोलीस व्यक्ती मला मेसेज करत आहे. की मी तुमच्यावर केस करीन तुमचा तो व्हिडिओ तुमच्या घरच्यांना पाठवीन तेसुद्धा आपण बघत नाही की ते पोलीस ऑफिसर कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये काम करत आहेत कारण आपण त्यावेळी खूप भिलेलो असतो आपल्या मनात भीती असते की माझ्या सोसायटी मधले रिपुटेशन खराब झालं तर माझे सोसायटीमध्ये असलेली इज्जत कमी झाली तर माझ्याकडे माझ्या सोसायटीमधील व्यक्ती कशी बघेल माझी आई वडील माझ्याकडे कसे बघतील माझी बायको माझ्याकडे कशी बघतील किंवा माझे मित्र परिवार माझ्याकडे कसे बघतील याचा सगळ्याचा आपण विचार करतो आणि जी समोरची व्यक्ती आपल्याकडे पैशाची डिमांड करत आहे ती आपण डिमांड पुरी करतो आणि ह्या दलदलीत आपण पूर्णपणे स्वतःला स्वतःहूनच अडकून घेतो.
एकदा का आपण या दलदलीत अडकलो तर आपण परत काही निघायचं रस्ता आपल्याला दिसत नाही पण यावर रस्ता असतो कारण कोणताही क्राईम करत असताना कोणताही गुन्हेगार हा परफेक्ट नसतो तो काही ना काही तरी छोटासा एव्हिडन्स हा सोडूनच जात असतो. त्यालाच आपण CHANCE OF EVIDENCE म्हणतो आणि त्या इव्हिडन्स वर आपल्या आपण त्या व्यक्तीला पकडून सुद्धा शकतो. यावेळी आपल्याला खरोखर स्वतःला सायकॉलॉजी नीट ठेवून आपण ही कंप्लेंट पोलिसांच्या मध्ये करायची असते. पण आत्ताच्या सोसायटीमध्ये पाहिलं किंवा आत्ताच्या या युगामध्ये बघितलं तर माणूस एक वेळा असा विचार करतो की मी एक वेळ पैसा देतो पण पोलिसांना काय सांगत नाही. मला पोलिसांच्या सारख्या सारख्या स्टेशनच्या पायऱ्या चढायच्या नाहीत. मला कोणत्याही केस मध्ये अडकायचं नाही हे असं आपण विचार करतो पण तुम्ही हा विचार करत असताना तुम्ही स्वतः किती आर्थिक दृष्ट्या त्या व्यक्तीला पैसे दिले याचा विचार नाही करत. तुम्ही हे विचार करता की माझ्याबरोबर जे घडले तुम्ही पोलिसांना कसं सांगू पोलिसांना कसे दाखवू पोलीस काय म्हणतील. पोलीस तुम्हाला काही म्हणत नाहीत पोलिसांना त्यांना विविध EVIDENCE ची गरज असते कोणीही असले क्राईम रेकॉर्ड करत नाही. त्याचा FIR बनवायला जात नाही किंवा जाऊन त्याची पोलीस स्टेशनला नोंद सुद्धा करत नाहीत. म्हणूनच हे क्राईम वाढलेले आहेत.
जर समजा आपल्याबरोबर असं काय झालं तर आपण काय करावं,
1. अननोन फ्रेंड रिक्वेस्ट आपण एक्सेप्ट करायचे नाही.
2. ऑनलाइन व्हिडिओ कॉल आला असेल तर तो एक्सेप्ट करायचा नाही किंवा तसेच कोणत्याही अननोन तुम्हाला फोन कॉल आला तर तो सुद्धा एक्सेप्ट करायचा नाही.
3. व्हिडिओ कॉल वर किंवा मेसेजिंग वर आपले आपले नको ते फोटो सेंड करायचे नाहीत, किंवा ऑनलाईन व्हिडिओ कॉल ला नको त्या अवस्थेत तेथे नसावे.
4. तुम्ही 100 किंवा 112 नंबर ला कॉल करावा, आणि आपली माहिती सांगावी नाहीतर आपण cybercrime.gov.in त्या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही तुमची कंप्लेंट नोंदवू शकता.
5.. इव्हिडन्स त्याची स्क्रीन शॉट किंवा ज्या ते सर्व काही तुम्हाला पोलिसांना द्यावे लागतात 6.तुम्हाला ज्या अकाउंट वरून मेसेज घेताय व्हिडिओ कॉल येत आहे त्या मेसेजला त्या अकाउंटला तुम्ही रिपोर्ट मारायचा.
7. जो काय नंबर वर तुम्हाला कॉल येत आहे त्या कॉल ला सुद्धा ट्रू कॉलर वर जाऊन तुम्ही तेथे त्याला तुम्ही रिपोर्ट मारू शकता.
8. तुम्हाला जी व्यक्ती सांगते की आम्ही YouTube वर न कॉल केलेला आहे कॉल करत आहोत मी YouTube चा मॅनेजर बोलत आहे तर सगळ्यात पहिले अशी गोष्ट असला कोणताही अशील व्हिडिओ किंवा अशील कंटेंट व्हिडिओ युट्युब एक्सेप्ट करत नाही. त्याला ते सपोर्ट करत नाही.
9. पोलीस स्टेशनला जाऊन त्याची नोंद करावी पोलीस स्टेशनला गेल्यावर तुम्हाला काय काय द्यायचं आहे म्हटला तर सगळ्यात
1. तुमच्याकडे असलेले ते चॅटिंग तुमच्या ज्या दोन व्यक्तींमध्ये झालेल्या ते चॅटिंग.
2. त्यानंतर त्यांनी डिमांड केलेला की ह्या नंबर वर मला पैसे पाठवा, तो नंबर ज्याच्यावरून तुम्हाला कॉल आलेला आहे तो मोबाईल नंबर.
3.त्या व्यक्तीने तुम्हाला सेंड केलेली लिंक तुम्हाला दाखवलेला तुमचाच व्हिडिओ.
हे सर्व काही तुम्हाला पोलीस स्टेशनला द्यायचं हे सर्व काही तुम्ही जर पोलीस स्टेशनला दिला तर ते पोलीस त्याच्यावर ॲक्शन घेतात. सायबर डिपार्टमेंट त्याचे रक्षण घेतो आणि ते काय असेल ते त्यांची प्रोसिजर पूर्ण करतात. त्यानुसारच तुम्ही कंप्लेंट केला किंवा कंप्लेंट्स वाढले. सोसायटीमध्ये याच्यावरती जागरूकता आणू शकतात त्याच्यावर ते वेगवेगळे तुम्हाला माहिती देऊ शकतात. काय करावे किंवा काय नाही सायबर क्राईम तुम्हाला त्याची मदत करते. तुम्ही कंप्लेंट केला तुम्ही त्याची माहिती नीट दिला, तर तुमच्यामुळे सोसायटीमध्ये ज्याच्यावर असे काही झालेले आहेत किंवा होतील पुढे तर त्यांना त्यांचा माहिती मिळेल त्याबद्दल त्यांना माहिती मिळेल आणि असे पुढे क्राईम होणार नाहीत. त्याबद्दल पोलीस सुद्धा दक्षता घेतील.
तुमच्यावर जर असा काय झालं असेल तर तुम्ही त्याची कंप्लेंट नोंदवा. हे सर्व काही जे घडतं हे सायबर क्राईम मध्ये येतं आणि हे सुद्धा एक फॉरेन्सिक एक चांगलं डिपार्टमेंट आहे की सायबर क्राईम वर तुम्हाला सोल्युशन काढून दिलं जातं. आपलं सायकॉलॉजी एकदम चांगलं ठेवायचं जर तुम्ही ह्या ठिकाणी भीती वाटले तर तुम्ही त्या दलदलीत अडकाल आणि जर हे काही झालं तर हे तुम्हाला इमिजेटली तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा तुमच्याजवळ असलेल्या सायबर क्राईम डिपार्टमेंटला ही गोष्ट नक्की कळवा.
यावर तुम्हाला काही माहिती हवी असेल अजून तर खाली दिलेल्या मोबाईलवर तुम्ही फोन लावून माहिती घेऊ शकता आणि हे जे काही वरील कंटेंट आहे ही जी काही वरील माहिती आहे हे सर्व काही मी इंटरनेटवर तसेच माझ्या काही मित्र परिवारावर सुद्धा घडलेल्या त्याच्यावरून ही माहिती घेऊन ही मी माहिती लिहिलेली आहे..
धन्यवाद............!!!!!!!!
Social Media Platforms:
Facebook: https://www.facebook.com/Drushti-Forensic-consultancy-103396731551677
Email: - drustiforensiclab@gmail.com
WEB SITE:- First-Class Private Forensic Entity in Western Maharashtra (drushtiforensic.in)
Mobile No:- 9552912971



.png)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
THANK YOU FOR VISITE OUR
DRUSHTI FORENSIC BLOG, KOLHAPUR MAHARASTRA.
**ONE CHANCE TO COLLECT**
ADDRESS: - Near District Court, Behind Renuka Mandir, "Gruhyog" Apartment, Shop no "4", "a" Wing, Kasba bavda, Kolhapur, Maharashtra, 416006.
SOCIAL MEDIA: -
Facebook: - https://www.facebook.com/DrushtiForensicLab
Instagram: - https://www.instagram.com/drushtiforensiclab/#
LinkedIn: - https://www.linkedin.com/company/79086624/admin/feed/posts/
YouTube: - https://www.youtube.com/@drustiforensiclab9437
BLOG:- https://www.blogger.com/blog/posts/1266176453495302806
WhatsApp Group: - https://chat.whatsapp.com/GWbLGYAjCjC95J7aBbqhCK
Drushti Forensic on WhatsApp: - https://wa.me/message/OEHHUNET2U63N1
WEB SITE: - WWW.DRUSHTIFORENSIC.IN
MAIL: - WWW.DRUSTIFORENSICLAB@GMAIL.COM
CONTACT NO.: - 9552912971.