डिजिटल पुरावे म्हणजे काय ??? डिजिटल पुरावे कसे वापरता येतात..


आपण 21 व्या युगामध्ये राहतो. आपण सर्वांनी मिळून एका नव्या युगामध्ये प्रवेश केलेला आहे. आपल्यामध्ये रोजच्या रोज नवनवीन टेक्नॉलॉजी, नवनवीन सॉफ्टवेअर, नवीन गॅजेट्स हे रोजच्या रोज आपल्या लाईफस्टाईल मध्ये ऍड होत आहेत आणि आपण त्या सर्व गोष्टीचा उपयोग करत आहोत. सध्याच्या 21व्या युगामध्ये आपण सर्वच्या सर्व कामे ऑनलाईनच करतो. कोणाला तरी पैसे पाठवायचे असतील तर, आपण गुगल पे, फोन पे, चा वापर करतो. कोणाला एकादरी संदेश पाठवायचा असेल तर, आपण फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम, लिंकदिन, टेलिग्राम, ट्विटर याचा वापर करतो. साधं एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा जरी द्यायचे असतील तरी, आपण त्याला सोशल मीडियावर देतो. एखाद्या व्यक्तीला दुःखद बातमी सांगायचे असेल तर आपण एका मिनिटात फोन लावून त्या व्यक्तीला ती बातमी सुद्धा पोच करतो. हे सर्व गोष्टी आपण आपल्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करूनच करतो. सुरुवातीला एखाद्या कारखान्यांमध्ये शेकडो कामगार काम करायचे आता त्या कारखान्यांमध्ये माणसे कमी मशिनरी जास्त झालेले आहेत. रोबोट सारख्या मशिनरी तेथे काम करतात. सुरुवातीला खेडेगावात ऊस तोडायला शेतमजूर यायचे, आता शेतमजूर गेले, डायरेक्ट मशीन तोड केली जाते. अशा टेक्नॉलॉजी मुळे आपण सध्या खूप अग्रेसर झालेला आहोत, आणि आपला भारत सुद्धा महासत्ता बनण्याकडे आगेकूच करत आहे.

मग या सर्व टेक्नॉलॉजी वापरत असताना, याचा आपण उपयोग घेत असताना,  करत असताना छोट्या छोट्या गोष्टीमुळे डिजिटल क्राईम सायबर क्राईम वाढला आहे. या गोष्टीमुळे समाजामध्ये एक अशी लेव्हल तयार झालेले आहे की, ” पती-पत्नी यांचा तलाक होण्याचे कारण फक्त आणि फक्त मोबाईल वापर यामुळे होतो.” परवा न्यूज पेपर मध्ये एक न्यूज झाली होती, नागपूर सारख्या शहरांमध्ये 85% तलाक फक्त आणि फक्त पती किंवा पत्नीचा खूप वेळ मोबाईल वापरत असल्यामुळे झालेला आहे. त्यांचे कारण एकच होते की माझा पार्टनर तो मोबाईल खूप वेळ वापरतात आणि मला असा समज आहे की त्यांचं, कुठेतरी अफेअर चालू आहे. मोबाईल ही एक वस्तू आहे तीच वस्तू आता समाजामध्ये पती-पत्नीच्या नात्यांमध्ये फूट पाडण्याचे सुद्धा काम करत आहे.

डिजिटल पुरावे म्हणजे काय ??? डिजिटल पुरावे कसे वापरता येतात..


पती-पत्नीचे संबंध किती चांगले असावेत हे आपल्याला आपल्या घरातील जुने वडीलधारी लोक सांगतात. पण ऑनलाइन एखादी रिक्वेस्ट आली की, आपण एक्सेप्ट करतो, त्या व्यक्तीबरोबर बोलायला चालू करतो. आपलं चॅटिंग होतो, आपण एकमेकाला मोबाईल नंबर आपले एकमेकाला फोटो सेंड करतो, आणि आपले ऑनलाइन मैत्री सुद्धा होते. पण ह्या गोष्टी करत असताना ती व्यक्ती आपलं लग्न झालेल्या, आपल्याला बायको मुलं आहेत, किंवा किंवा एखादी महिला आपलं लग्न झालेल्या आपल्याला नवरा आहे. आपल्याला बाळ आहे ,त्याचा विचार करत नाही आणि त्या एखाद्या व्यक्तीबरोबर ते चॅटिंग करत जातात. त्यांचे प्रेम होतं आणि ते तलाक सुद्धा घेतात.

आता शाळेत जाणाऱ्या मुलांच्या कडे सुद्धा मोबाईल असतात. त्या मोबाईल मध्ये ते काय वागत असतील ? त्याचा वापर कसा करत असतील ? याचा कोणीही विचार करत नाही. आपण चांगल्या उद्देशाने त्यांना मोबाईल दिलेला आहे की तू कुठेतरी जाताना लेट झाला असेल, तर घरी फोन कर येत असताना फोन कर, काहीतरी प्रॉब्लेम झाला तर फोन कर हा. आपला उद्देश चांगला आहे. पण मुलं त्या मोबाईलचा दुरुपयोग सुद्धा करतात नको त्या वेबसाईटवर जाणे आत्ता आठवी नववीचे मुले सुद्धा व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या गोष्टी वापरतात आणि आपले फोटोज बनवून सोडतात, मग या मुलांना फ्युचर ची काळजी नाही आहे का ??? यावेळी आपली लहान मुले त्या सोशल मीडिया वापरून क्राईम करतात त्यावेळी तो मोबाईल पोलीस चौकीत जमा होतो. मग आपण मोबाईल साठी पोलीस चौकीमध्ये येरझारा मारत असतो. आपल्या मुलाला सोडण्याचा प्रयत्न करत असतो , हे आपणाला एक साधा मोबाईल किती आर्थिक , मानसिक संकटात नेतो हे पहा.

तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर बोलता, त्या व्यक्तीला तुम्ही ऑनलाईन पैसे पाठवता, त्या व्यक्तीशी तुमचं चांगलं संबंध निर्माण करता आणि तीच व्यक्ती एखाद्या टायमाला फेक अकाउंट दिसते. तुम्हाला कधी माहिती वेगळीच सांगितली जाते आणि ती व्यक्ती वेगळीच असते तुम्ही त्या व्यक्तीला पैसे पाठवतात. त्या पैशाची तुमच्याकडे काही स्क्रीन शॉट असतात, काही त्याची माहिती तुम्ही सेव्ह केलेले असते ही सर्व माहिती तुम्हाला तुमचे पैसे परत मिळवून देण्यासाठी उपयोगी पडतात. हेच तुमचे डिजिटल पुरावे आहेत, आणि हे डिजिटल पुरावे तुम्ही कोर्टामध्ये सुद्धा सादर करू शकता. आता आपल्या समाजामध्ये काही लोक चॅटिंग करत असतात फोटोज अपलोड करत असतात. त्याच्यावर कमेंट येत असतात आणि त्या कमेंट्स मध्ये एखादी कमेंट वाईट सुद्धा असते ते त्यांना केस करायचे असेल त्यांना त्यांच्या काहीतरी मोटिव साध्य करायचं असेल, तर ते चॅटिंग ते तुमचे व्हिडिओज ते तुमचे पोस्ट तुम्ही कोर्टामध्ये पोलीस स्टेशनला सुद्धा सबमिट करू शकता. सर्वांना एवढेच माहिती आहे की, आपलं ऑनलाईन चॅटिंग आपण कोणाला की पाठवलेले पैसे, पोलीस कसे एक्सेप्ट करतील ?? ऑनलाईन पैसे पाठवलेले आहेत त्याचा वापर कुठे होईल ?? तो वापर कसा करावा या सर्वांची माहिती नसते, पण कोर्टामध्ये पोलीस स्टेशनमध्ये ह्या सर्व वस्तू तुम्ही देऊ शकता. पोलिसांना त्यानुसार इन्वेस्टीगेशन करता येतं आणि ते तुम्हाला तुमचे पैसे परत मिळवून सुद्धा देऊ शकतात. त्यामुळे तुमच्याकडे असलेले कोणतेही डिजिटल असू द्या, ते तुम्ही तुमच्या केस मध्ये तुमच्या कामांमध्ये किंवा पोलिस इन्वेस्टीगेशन मध्ये पोलिसांना द्या..

DRUSHTI FORENSIC LAB


सध्या फेसबुक वर फेक अकाउंट काढणे, इंस्टाग्राम अकाउंट ओपन करणे आणि तुमच्याच मित्राला मेसेज पाठवणे आणि मला एक पाचशे रुपये दे मला खूप गरज आहे. आपला मित्र आपणाला पैसे पाठवता त्याने दिलेल्या त्या नंबर वर पैसे पाठवतो. ते पैसे आपणाला येत नाहीत किंवा त्या मित्राला सुद्धा परत देण्यात एखाद्या माणसाला ते पैसे पाठवले जातात. यामध्ये तुम्ही सुद्धा मानसिक आणि आर्थिक नुकसानी मध्ये येतात. तुमचा मित्र सुद्धा मानसिक आणि आर्थिक नुकसानीमध्ये येतो. यावेळी तुम्ही मित्राने तुम्हाला सांगितले की मी तुला पैसे दिले होते. त्याची स्क्रीन शॉट तुम्ही केलेले चॅटिंग हे सर्व काही पोलिसांना द्या आणि सुरुवातीला ज्याचं फेक अकाउंट ओपन झालेला आहे त्यांनी सगळ्यात पहिला जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या अनोळखी माणसाविरुद्ध FRI करा. त्यावेळी पोलीस लगेच ती ओपन केलेले खोटं अकाउंट बंद करतात, पण आपण आपली सोसायटीमध्ये असलेली REPUTION आपण असलेले उच्च शिक्षण या सर्व गोष्टीचा उपयोग करण्यास उपयोग करता आपण ती सांभाळून ठेवण्यामध्येच बिझी असतो. तीच गोष्ट उद्या तुम्हाला खूप मोठ्या संकटात नेऊन टाकते. मग तुम्ही उद्या उठून हे असं झालं असतं साहेब असं सांगितलं तर पोलीस तुम्हाला काहीही करू शकत नाहीत. जेवढे तुमच्याकडे पुरावे असतील ते तुम्ही जमा करत जावा, पोलिसांना इन्वेस्टीगेशन मध्ये कुठून पाठवलं कोणी पाठवलं कसं पाठवलं याची पूर्णपणे माहिती गोळा करून ज्या व्यक्तींना हा गुन्हा केला त्या व्यक्तीला ते पकडण्यात सक्षम असतात फक्त त्यांना आपण आपले पुरावे देणे गरजेचे असतं.

सध्या मी सोशल मीडियावर आणखीन एक ट्रेड चालू आहे. एखाद्या मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट येते तेव्हा एखाद्या मुलगीची फ्रेंड रिक्वेस्ट येते. आपण ते एक्सेप्ट करतो,, चॅटिंग करतो, चॅटिंग करताना मोबाईल नंबर देतो, आणि व्हाट्सअप वर आपल्याला एक अननोन कॉल येतो, आपण तो कॉल रिसिव्ह करतो, रिसिव्ह केल्यावर पुढची व्यक्ती नको त्या अवस्थेमध्ये असते आणि ते आपण पाहतो. ती व्यक्ती जसजसं तुम्हाला माहिती देत जाईल तस तसं तुम्ही ते बनवत जाता किंवा करत जाता. आणि दहा मिनिटांनी , दोन मिनिटांनी किंवा दहा-बारा सेकंदांनी आपण ते कॉल कट करतो किंवा ठेवून देतो. त्यानंतर लगेच तुमच्या व्हाट्सअप ला तुम्ही बोललेले चॅटिंग तुमचा बनवलेला व्हिडिओ तुम्हाला इमिजिएटली येतो, आणि तेथे सांगितलं ,ते एवढे एवढे पैसे द्या, नाहीतर हे फोटो, नाहीतर हे व्हिडिओ मी सोशल मीडियावर किंवा तुमच्या जवळच्या नातेवाईकांना जवळच्या मित्रांना पाठवीन. मग आपण लगेच विचार करतो की, आता काय करायचं आपण सायकॉलॉजी  डिप्रेशन मध्ये जातो आणि आपण काही विचार करता त्या व्यक्तीला तू जेवढे मागील तेवढे पैसे आपण देतो. पण ही गोष्ट इथपर्यंत थांबते का नाही तुम्हाला परत त्या व्यक्तीचा महिन्यांनी परत फोन येतो. एवढे एवढे पैसे पाठवा नाहीतर मी परत व्हिडिओ शेअर करीन लगेच तुम्ही परत पैसे पाठवता. तुम्ही असे पैसे पाठवत पाठवत पाठवत राहता आणि एक वेळ तुम्ही अडचणीत येतात आणि तेव्हा तुम्ही पोलिसांच्या कडे जाताना पोलिसांना म्हणतात,” असं माझ्याबरोबर झालेला आहे ,आणि दोन महिने झाले मी अण्णा एवढी एवढी रक्कम दिलेली आहे.” मग त्यावेळी पोलीस तुमचे इन्वेस्टीगेशन करू शकतात का ??  करू शकतात . पण तुम्ही ज्यावेळी तुमच्या बाबतीत ते कळलं त्यावेळी तुम्ही जर दिला असता तुमच्याकडे असलेले व्हिडिओ तुमच्याकडे असलेले फोटोज तुम्ही पाठवलेले पैसे तर त्याचा वापर हा खूप चांगल्या रिते होतो. तुम्ही ज्यावेळी पैसे द्याल त्यावेळी ते व्हिडिओ सुद्धा वापरतात पण रिझल्ट मिळण्याचे चान्सेस कमी असतात. पण ज्यावेळी एखादा क्राईम घडला, त्यावेळी तुम्ही दिला तर ते तुम्हाला चांगल्या रिते रिझल्ट मिळवून देतात.

डिजिटल पुरावे म्हणजे काय ??? डिजिटल पुरावे कसे वापरता येतात..


मी दोन ते तीन दिवसांपूर्वी पेपर मध्ये वाचलं होतं की, अशा एका कारणामुळे एका मुलग्याने गळफास लावून घेतला. ही चांगली गोष्ट आहे का ?? नाही तुम्ही सायकॉलॉजी डिप्रेशन मध्ये जाऊन तुम्ही खूप मोठा डिसिजन केला. तुम्ही तुमच्या आई वडिलांना सुद्धा कसे सांगू ?? हे तुम्हाला कळत नाही ??  बरोबर आहे . ह्या गोष्टी कसे कोणाला सांगू हे सुद्धा कोणाला कळत नाही, पण तुम्ही ह्यावेळी डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊन . माहिती पोलिसांना द्या. ते व्हिडिओ पोस्ट करू शकत नाहीत , कारण सोशल मीडियावर असे अशील व्हिडिओ पोस्ट करायला परवानकी नाही आहे.  युट्युब सुद्धा असले व्हिडिओ अपलोड करून घेत नाही. त्यामुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता तुम्ही डायरेक्ट पोलिसांना भेटा त्यांना सर्व माहिती सांगा. आणि तुमच्या विरुद्ध झालेल्या ऑनलाइन CHEETING ची माहिती पोलिसांना द्या.  पोलीस तुम्हाला मदत करतील.

असे अनेक पुरावे आहेत किंवा अनेक असे गुन्हे घडलेले सुद्धा आहेत. याला हनी ट्रॅप म्हणतात. पेपराला सुद्धा वाचला असाल की , ट्रॅपमध्ये मोठ मोठे राजकारणी व्यक्ती सुद्धा अडकल्यात, मोठमोठे बिजनेस मॅन लोक सुद्धा अडकल्यात, आहेत.  कारण त्यांना ह्या गोष्टीची माहिती नव्हती. पण आता समाजामध्ये जागरूकता आलेले आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही अननोन माणसाचा फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करत जाऊ नका, कोणत्याही अननोन माणसाचा व्हिडिओ कॉल रिसिव्ह करत जाऊ नका, आणि नको त्या लिंक वर क्लिक करत जाऊ नका. ह्या तीन गोष्टी तुम्ही फॉलोअप केला तर तुम्हाला डिजिटल काहीही प्रॉब्लेम येत नाही, पण काहीतरी प्रॉब्लेम झाला तर तुम्ही लगेच पोलीस स्टेशनला जावा तुमची कंप्लेंट करा आणि तुम्ही त्यांना तुमच्याकडे असलेले पुरावे त्यांना द्या. जर तुम्हाला स्वतः हजर नाही राहता नाही आलं, तर पोलिसांची ऑनलाईन सेवा सुद्धा आहे. तुम्ही ऑनलाईन त्यांना माहिती द्या पण याच्याबद्दल तुम्ही माहिती द्या, कारण ह्यामध्ये तुम्हाला काही पैसे भरायचे नाही किंवा तुम्हाला काही त्रास होणार नाही. पण ह्या गोष्टीची तुम्ही पोलिसांना माहिती दिला तर पोलीस समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी काहीतरी करतील आणि या गोष्टीचा समाजामध्ये असलेल्या लोकांना मुलांना याचा उपयोग होईल.



मोबाईल मुळे लोकांचे तलाक सुद्धा होतात. त्यावेळी तुम्हाला कोर्टामध्ये हे असलेले तुमच्याकडे काही त्यांचे त्रिस्थ माणसाबरोबर किंवा प्रेम प्रकरणाबद्दल काही माहिती असेल एखादा फोटो व्हिडिओ, इमेज काहीतरी असेल तर ते तुम्ही कोर्टामध्ये देत जावा. डिजिटल पुरावा म्हणून कोर्ट एक्सेप्ट करेल किंवा नाही या गोष्टीचा तुम्ही विचार करू नका ??  कोर्टाच्या हातात पावर असते,  पोलिसांच्या हातात असतं की, हे EVIDENCE कशाप्रकारे वापरायचे तुमची इन्वेस्टीगेशन तर करायला मिळेल. त्यावर काहीतरी रिझल्ट सुद्धा कळतील, त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे असलेली EVIDENCE ते डिजिटली असून त्यात तुमच्या विरुद्ध जरी असतील पण तुम्ही देत जावा, आणि स्क्रीन शॉट काढून ठेवणे हे चांगली गोष्ट आहे, कारण तुम्हाला उद्या ते उपयोगाला येतील. तुमच्याविरुद्ध जर डिजिटली फ्रॉड झाला तर तुमच्याकडे असलेले कोणतेही पुरावे असून त्यात ते डिजिटल असतील, तरीसुद्धा तुम्ही ते कोर्टामध्ये व पोलिसांना द्या.

 धन्यवाद….

आता आपल्या कोल्हापूरमध्ये सुद्धा फॉरेन्सिक सायन्स ची सर्विस चालू झालेले आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या हाताचे ठसे, सही हस्ताक्षर तपासून मिळतात.
असेच आपण फॉरेन्सिक सायन्स बद्दल मराठी भाषेमध्ये ज्ञान घेऊया. 

DRUSHTI FORENSIC, KOLHAPUR MAHARASTRA.

 **ONE CHANCE TO COLLECT**

Add: - Near District Court, Behind Renuka Mandir, "Gruhyog" Apartment, Shop no "4", "a" Wing, Kasba bavda, Kolhapur, Maharashtra, 416006.

FACEBOOK, INSTAGRAM, LIKEDIN: - DRUSHTI FORENSIC LAB

WEB SITE: - WWW.DRUSHTIFORENSIC.IN

MAIL: - WWW.DRUSTIFORENSICLAB@GMAIL.COM

CONTACT NO.: - 9552912971.

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दस्ताऐवज पुरावा (महत्त्वाचा भाग)

गुन्ह्याचा तपास

फॉरेन्सिक सायन्स आणि न्यायालयाचा संबंध