फिंगरप्रिंट चे टाईप (FORENSIC SCIENCE)

 फिंगरप्रिंट चे टाईप

आपण मागील भागामध्ये पाहिलो की फिंगरप्रिंट चे पॅटर्न कोणकोणते असतात आणि ते किती लोकांच्या मध्ये विभागलेले आहेत. त्याचा वापर आपणाला कोठे होतो. या सर्व गोष्टीचा आपण मागल्या भागामध्ये अभ्यास केलेला आहे.

 आज आपण पाहणार आहोत की, फिंगरप्रिंट चे टाईप कोणकोणते आहेत. फिंगरप्रिंट चे तीन टाईप आहेत ते टाईप आपणाला क्राईम सीन मध्ये उपयोगी पडतात आणि आपण ते डेव्हलप करू शकतो. तर मग आता आपण पाहूयात की फिंगरप्रिंटचे कोणकोणते टाईप आहेत. तर पहिला आहे विजीबल प्रिंट दुसरा आहे प्लास्टिक प्रिंट आणि तिसरा आहे लेटेस्ट प्रिंट.

  • 1.      विजीबल प्रिंट:- हे आपल्या बोटांच्या वर कोणते तरी कलरचे मटेरियल लागले असेल, जसं काही कलर, शाही, धूळ, रक्त किंवा जे आपल्या डोळ्याला दिसतील असे मटेरियल. ह्या मटेरियल वरून आपण एखाद्या ठिकाणी हात जर आपला लागला तर तेथे आपले फिंगरप्रिंट थ्रीडी डायमेन्शन मध्ये दिसायला सुरुवात होते. मग आपणाला क्राईम सीन मध्ये जर असे फिंगरप्रिंट दिसले तर आपण लगेच त्याची फोटोग्राफी करायची आणि नंतर ते डेव्हलप करून आपल्या FORENSIC LAB पाठवून द्यायचे.

FINGERPRINT TYPE


  • 2.       प्लास्टिक प्रिंट:- हे सगळ्यात जास्त म्हणजे साबण, मेणबत्तीचा किंवा वाळलेलं रक्त, वॅक्स यांसारख्या याच्यावर हे फिंगरप्रिंट आपणाला दिसतात.


  • 3.      लेटेस्ट प्रिंट:- लेटेस्ट प्रिंट याला दुसरं नाव आहे चान्स प्रिंट. म्हणजे हे आपणाला डोळ्याला दिसत नाहीत. हे फिंगरप्रिंट क्राईम SCENE आपणाला कुठेही असू शकतात. ते आपणाला डेव्हलप करायला लागतात. मग त्याचे फोटोग्राफी करून आपण LAB पाठवू शकतो.

 

LATENT FINGERPRINT

आता जे आपण वर पाहिलं ते फिंगरप्रिंटचे टाइप्स यामध्ये गुन्ह्याच्या स्थळावर क्राईम सीनवर आपणाला लेटेस्ट प्रिंट हुडकण्याचे एक मोठे चॅलेंज असते.

 उदाहरणार्थ समजा एखाद्या घरात चोरी झालेली आहे त्यांनी घराचा दरवाजा फोडून आत मध्ये येऊन चोरी करून गेलेले आहेत. तर आपण सुरुवातीला चार स्प्रेड दरवाजाजवळ असलेल्या लॉकवर आपण शोधू शकतो. त्यानंतर जिथून ते सोने किंवा चांदी चोरीला गेले असेल. तेथे आपण शोधू शकतो. पण हे सर्व काही युज करताना. आपणाला तेथे डेव्हलप करण्यासाठी पावडर वापरले जातात आणि यालाच आपण डेव्हलपिंग मेथोड म्हणतो. त्यानंतर जिथे आपणाला हे फिंगरप्रिंट मिळतील. ते फिंगरप्रिंट आपण घेऊन त्याला लिफ्ट केलं जातं, आणि त्यानंतर त्याला पाठवले जाते. हे आहेत फिंगरप्रिंटचे तीन पॅटर्न आणि ते कोणत्या स्थळी सापडू शकतात हे आपण पाहिलेलं होतं.

 

 पुढील भागामध्ये आपण फिंगरप्रिंट डेव्हलप कसे केले जातात आणि त्यासाठी कोणकोणते मेथड आहेत हे पाहूया.

 धन्यवाद.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सायबर क्राईम

क्रिमिनोलॉजिकल टॉक्सिकॉलॉजीचा अभ्यास