डिफेक टेक्नॉलॉजी

 

डिफेक टेक्नॉलॉजी

    सध्या आपण सर्वजण सोशल मीडिया वापरतो. याच्या मध्ये आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या लोकांशी बोलतो. आपण वेगवेगळे मित्र गोळा करतो. वेगवेगळ्या मित्रांच्या बरोबर वेगवेगळ्या देशातील लोकांच्या बरोबर आपले चॅटिंग होतो. संभाषण होतं. यामध्ये आपण कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपण सर्व गोष्टीवर त्या अनोळखी व्यक्तीबरोबर आपण संभाषण करतो. याच्यामध्ये आपण वेगवेगळे प्लॅटफॉर्म वापरतो त्यावर आपण स्वतःची माहिती फील करतो आणि स्वतःचा अकाउंट तयार करून आपण ते वापरतो आणि संभाषण करतो.

 सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ भरपूर धुमाकूळ घालत आहे. एका व्यक्तीने अभिनेत्रीचा चेहरा पूर्णपणे चेंज करून दुसऱ्या बॉडीवर तिचा चेहरा चिटकवला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून दिला. यावर कोणालाही लवकर ओळखले नाही की तो चेहरा त्याच व्यक्तीचा आहे. हेच सर्वांना वाटलं पण ती एक डिफेक टेक्नॉलॉजी होती.



डिफेक टेक्नॉलॉजी म्हणजे काय ???

  डिफेक्ट टेक्नॉलॉजी म्हणजे तुमचा चेहरा बदलणे. तुमच्या चेहऱ्यांबरोबर तुमचा आवाज बदलणे किंवा तुमच्या दुसऱ्याच्या व्हिडिओमध्ये तुमचा चेहरा चिटकवणे आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करून देणे. सध्या भारतामध्ये भरपूर प्रमाणात धुमाकळ घालत आहे. सध्याच दोन दिवसापूर्वीच पंतप्रधान मोदींनी सुद्धा या विषयावर खूप मोठी चिंता व्यक्त केली कारण त्यांचाच कुणीतरी व्हिडिओ ते गाणं म्हणत असत्याल आणि गरबा खेळत असलेला दाखवण्यात आलं. त्यामुळे हा प्रश्न खूप मोठा आत्ताच्या सध्याच्या युगामध्ये उपस्थित झालेला आहे.

डिफेक टेक्नॉलॉजी आली कशी आणि ची सुरुवात झाली तरी कुठून

    2017 reddit या युजरने अश्लील व्हिडिओ टाकण्यासाठी तो गुगल सारख्या प्लॅटफॉर्मवर ओपन सोर्स वर काम करत होता, आणि तोही व्हिडिओज तेथे टाकायचा तवापासून याचा वापर करण्यात आला.



 मग या डिफेक टेक्नॉलॉजीचा वापर कुठे होतो??

  1. तर प्रत्येक तर एक फेक बातमी पसरवण्याकरता.  यावद्वारे वेगवेगळी माहिती जी माणसाला माहीत नाही पण ती समाजामध्ये वितृष्ट निर्माण करण्यासाठी वापरतात.

 2. एखाद्या व्यक्तीला खराब करायचं असेल एखाद्या व्यक्तीचा कॅरेक्टर बात करायचे असेल एका व्यक्तीचे चरित्र खराब करण्यासाठी सुद्धा याचा वापर करता. याच्यामध्ये मोठमोठे पोलीस मोठे मोठे राजकीय नेते मोठमोठे बिजनेस मॅन यांचा वापर यामध्ये केला जातो.

 त्याचबरोबर जे माणूस वास्तव मध्ये आहे त्याची जो कल्पना करत होता. ती कल्पना ह्या AI टेक्नॉलॉजीने पूर्णपणे वास्तवात आणून दाखवलेल्या जी कल्पनाने वास्तव मध्ये एखादी रेषा होते अंधुक ती पूर्णपणे रेषा टेक्नॉलॉजीने पूर्णपणे मिटवून टाकलेले आहे. याचा चांगला उपयोग म्हणायला गेला तर आपण जुन्या काळात आपणाला ज्या ज्या शूरवीर लोकांची आपण फक्त माहिती घेत होतो. त्यांचे चेहरे बनवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. ही एक सकारात्मक बाजू आहे. पण ही सकारात्मकता बाजूला सोडून त्याचा वापर वास्तवात समाजामध्ये पूर्णपणे वितृष्ट निर्माण करण्यासाठी केला जात आहे.


  याच्यामध्ये उदाहरणच पाहायला गेलं तर

 1. केरळमध्ये सुद्धा एक मुलग्याच्या घरी फोन करण्यात आला, दुसऱ्या मोबाईल वरून की बाप्पा माझा एक्सीडेंट झालेला लवकरात लवकर मला चाळीस हजार रुपये पाठवा. माझा मोबाईल फुटलेला आहे आणि मला दवाखान्यात ऍडमिट केलेला आहे. तर ते तेथे वडील पोहोचले तेथे ते त्यांचा मुलगा नव्हता. त्यानंतर त्यांचा मुलगा सांगितला घरी पोहोचला. त्यावेळी त्यांना या गोष्टीची रियालिटी कळली.

2. सर्वात मोठी गोष्ट रश्मिका मंदांना यांचा व्हिडिओ तर सोशल मीडिया केवढा मोठ्या प्रमाणात वायरल झाला.



याची माहिती तुम्ही सुद्धा ओळखू शकता ते म्हणजे

1.     1.  डोळ्यांच्या गती पाहणी आपली गती आणि व्हिडिओमध्ये तयार केलेल्या गतीमध्ये खूप फरक असतो .तुमच्या चेहऱ्यावरील रंग त्याच्या आजूबाजूला असणारे लाईटचा वापर सुद्धा त्यामध्ये आपणाला ओळखून येत.

2.       2. आवाजामधील वेगवेगळेपणा आवाज कंटिन्यूअसली नसण्याचा त्याचबरोबर चेहऱ्यावरील हावभाव या सर्व गोष्टीवरून आपण तो डिफेक एक व्हिडिओ आहे की नाही हे आपण बघू शकतो.

 नियम

 मग याच्यावर काही नियम आहेत की नाहीत किंवा याच्यावर सरकारने काय प्रश्न विचारलेले आहेत का नाही तर सरकारने सुद्धा याच्यावर काय काढलेलं आहे ते म्हणजे

1. तुम्ही त्या व्यक्तीवर मानहानीची केस घालू शकता.

2.  त्याचबरोबर व्यक्तिगत डेटा संरक्षण विधेयक 2022 याचा वापर तुम्ही करू शकता.

 या दोन गोष्टीचा वापर तुम्ही करू शकता आता सध्याच्या युगामध्ये पाहिलं तर हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे तुम्ही मध्ये सुद्धा पाहिला असाल भरपूर राजकीय नेत्यांचे फोटोज तयार करून टाकण्यात आले. ती पूर्णपणे टेक्नॉलॉजीने वापरली होती. जगाला पुढे नेण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर होतो. हे आपण सर्वांनी मांडलं होतं. आपण सर्वांना माहीत आहे की, विज्ञान युगामध्येच AI याने खूप मोठ्या प्रमाणात समाजामध्ये वितृष्ट निर्माण करत आहे. तर सर्वांनी आपलं सोशल मीडिया खूप नाजूकपणे हाताळावं आपली माहिती सोशल मीडियावर टाकू नये. आपल्या घरी परिवारातले फोटो टाकू नये आणि नाहीतर त्याचा आपणालाच भरपूर त्रास होईल ही माहिती.

 आपण सर्वांच्या बरोबर शेअर करावी ही विनंती त्यामुळे बाकीच्या लोकांना सुद्धा याचा थोडाफार प्रमाणात उपयोग होईल.

धन्यवाद….

 आपण फॉरेन्सिक सायन्स बद्दल मराठी भाषेमध्ये ज्ञान घेऊया

 

      DRUSHTI FORENSIC, KOLHAPUR MAHARASTRA.

 **one chance to collect**

पत्ता:- जिल्हा न्यायालयाजवळरेणुका मंदिराच्या मागे, "गृहयोगअपार्टमेंटदुकान क्रमांक "4", "विंगकसबा बावडाकोल्हापूरमहाराष्ट्र, 416006. सोशल मीडिया:

फेसबुक :- https://www.facebook.com/DrushtiForensicLab

इंस्टाग्राम :- https://www.instagram.com/drushtiforensiclab/#

लिंक्डइन :- https://www.linkedin.com/company/79086624/admin/feed/posts/

YouTube :- https://www.youtube.com/@drustiforensiclab9437

व्हॉट्सअॅप ग्रुप :- https://chat.whatsapp.com/GWbLGYAjCjC95J7aBbqhCK

 Drushti Forensic on WhatsApp: - https://wa.me/message/OEHHUNET2U63N1

वेब साईट :-  WWW.DRUSHTIFORENSIC.IN

मेल :-  WWW.DRUSTIFORENSICLAB@GMAIL.COM

संपर्क क्रमांक:- 9552912971.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सायबर क्राईम

क्रिमिनोलॉजिकल टॉक्सिकॉलॉजीचा अभ्यास