फॉरेन्सिक सायन्स समजून घेणे गुन्ह्याच्या दृश्या मागील सत्य उघड करणे


 तुम्ही सर्वांनी टीव्हीवर सीआयडी व क्राइम पेट्रोल सारखे शो पाहिलेले असाल किंवा पाहत सुद्धा असाल. त्यामध्ये तुम्ही जे फॉरेन्सिक सायन्स बघता ते आणि रियल मधील फॉरेन्सिक सायन्स मध्ये खूप तपावता आहे. आपण चित्रपटाद्वारे पाहिलेल्या फॉरेन्सिक सायन्सने आपल्या कल्पनाशक्तीवर आणि आपल्या डोक्यावर त्यांनी त्यांचं घर केलेलं आहे.

 आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत की, फॉरेन्सिक सायन्सच्या मूलभूत गोष्टीचा शोध कसे घेतात ???  ते काम कसे करतात ??? आणि न्यायव्यवस्थेत ते महत्त्वाचे कसे आहे.” तुम्ही क्राईम शो आनंदी होऊन पाहता आणि त्यातून आपणाला मार्गदर्शन कळते. काल्पनिक कथा मधील ते फॉरेन्सिक सायन्स कसे आहे आणि ते कसे काम करते.



 फॉरेन्सिक सायन्स म्हणजे काय ???

 फॉरेन्सिक सायन्स म्हणजे गुन्ह्यामध्ये तपास करण्यासाठी वैज्ञानिक तत्वे आणि फॉरेन्सिक तंत्राचा वापर करणे, एखाद्या गुन्ह्यामध्ये एखाद्या सहभाग असेल तर त्याला कसे ओळखून काढणे किंवा त्याला कसे पाहणे, त्याच्यावर फौजदारी न्याय व्यवस्थित ते कसे आहे, याची सर्व भूमिका आपण त्याच्यामध्ये करतो. फॉरेन्सिक शास्त्रज्ञ एकेक छोटे-छोटे पुरावे तपासून त्यामधून न्याय देण्याचा प्रयत्न करतात. जसे की फिंगरप्रिंट तपासणी, रक्त तपासणे, डोक्यावरील केस तपासणे आणि डिजिटल डेटा तपासणी यांच्या मधून फॉरेन्सिक तज्ञ पुरावा शोधून त्या पुराव्यावर रिपोर्ट बनवून देतात. यालाच फॉरेन्सिक सायन्स म्हटले जाते.

सामान्य फॉरेन्सिक तंत्रज्ञाने कोणकोणते आहेत ????

 तर फॉरेन्सिक सायन्स मध्ये अनेक तंत्रज्ञाने आहेत. त्यामध्ये प्रत्येकाची खासियत असते. त्यामधील थोड्याशा गोष्टी आज आपण पाहूया,

फिंगरप्रिंट विश्लेषण:-

 फिंगरप्रिंट मध्ये एखाद्या व्यक्तीचा हाताचा ठश्याचा विश्लेषण करून, त्याच्यावर फॉरेन्सिक तज्ञ रिपोर्ट बनवतात. एखाद्या गुन्ह्याच्या ठिकाणी एखादा चाकू किंवा आणखीन कोणतेही हत्यार सापडले तर, त्यावरील फिंगरप्रिंट शोधून त्याचे विश्लेषण करून दिले जाते.

डीएनए प्रोफाइलिंग:-           

डीएनए प्रोफाइल मध्ये रक्त, केस आणि इतर शारीरिक द्रव्य गोळा करून त्याचा अहवाल बनवला जातो आणि यामधून आपण संशितीला हुडकून काढू शकतो.

बॅलॅस्टिक:-

 म्हणजे दारुगोळा यांचा अभ्यास करून अहवाल बनवला जातो. त्याच्यामध्ये गोळ्याच्या खुणा, गन पावडर यांचे विश्लेषण केले जाते.

विष शास्त्र:-

 विष शास्त्र मध्ये औषधे, अल्कोहोल आणि विष हे शरीरात कसे गेले ??? शरीरात त्याचा काय दुरुपयोग झालाय ??? याचा सर्व अभ्यास याच्या मध्ये केला जातो.

 डिजिटल पुरावे:-

 पैसे पाठवण्यापासून ते वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यापर्यंत किंवा एखाद्य हे सर्व गोष्टी आपण डिजिटलीच करतो. आपण साधे कुठे जरी फिरायला गेलो तरी तो आपण फोटो व्हिडिओ आपण सोशल मीडियावर टाकतो. हे सर्व डिजिटल पुरावे तपासून त्याचा अहवाल बनवला जातो. याच्यामध्ये संगणक, स्मार्टफोन, इलेक्ट्रिकल उपकरण यांच्यापासून डेटा पुनर्प्राप्त केला जातो आणि त्याच्यावर विश्लेषण केले जाते.

 हे आहेत वर बघितलेले आपण जे सगळ्यात जास्त फॉरेन्सिक तंत्रज्ञान म्हणून वापरले जाते. त्याच्यामध्ये अजून खूप तंत्रज्ञान ते आपण पुढील ब्लॉगमध्ये जसजसे जाऊ तसे आपण ते नक्कीच पाहू. 

फॉरेन्सिक सायन्स गुन्ह्याची निराकरण करण्यात कशी मदत करतात ???

 तर फॉरेन्सिक सायन्स हे केस सोडवण्यासाठी गुरुकिल्ली आहे असे म्हणणे काय वावगे जाणार नाही. Crime scene ठिकाणी पोहचून Crime scene ठिकाणाचा तपास केला जातो तिथून वेगवेगळे पुरावे गोळा केले जातात. ते सर्व पुरावे पॅक केले जातात आणि फॉरेन्सिक लॅब मध्ये आणले जातात, म्हणजे प्रयोगशाळेत आणले जातात.

 प्रयोगशाळेत जी पुरावे गोळा केलेल्या त्या प्रत्येक पुराव्याचे छोटे-छोटे असे सर्व काही विश्लेषण केले जाते आणि त्याच्यावर अहवाल केला जातो. त्यानंतर त्या प्रयोगशाळेत जे काही तपासले त्याच्या परिणामाचे स्पष्टीकरण हे आपल्या अहवाल केले जाते. हा अहवाल महत्त्वाचा असतो. त्याच्या मध्ये गुन्हा कसा घडला आणि त्यामध्ये काय काय वापरले गेले, याच्या सर्वांच्या नोंदी असतात. त्यानंतर अहवाल तयार झाला की, त्यानंतर तो कोर्टामध्ये आला.

तज्ञाना कोर्टामध्ये साक्षीला सुद्धा हजर राणे बंधनकारक असते आणि साक्षीदार म्हणून ते कोर्टात हजर सुद्धा राहतात. त्याच्यामध्ये त्यांनी काय काय केलेले आहे. कसे केलेल्या कोणकोणते उपकरणे वापरल्यात कोणकोणते तंत्र वापरलेले आहेत. त्यांना काय मिळाले. त्यांनी काय केले ह्या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास ते कोर्टाला सांगतात. आणि याची कोर्टाला दाखवतात.

फॉरेन्सिक सायन्सचा समाजाला मदत होतो का ?

 तर हो समाजाला याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा आहे. त्याच्यामुळे अनेक फौजदारी केसेस आपण सॉल करू शकतो. वेगवेगळे पुरावे आपण वापरून कोर्टामध्ये देऊ शकतो. त्या पुरावे तुम्हाला तुमचा निकाल जिंकण्यासाठी उपयोग होऊ शकतात. हे फक्त आणि फक्त फॉरेन्सिक तज्ञच करू शकतात.

फॉरेन्सिक सायन्स हे एक आकर्षक क्षेत्र आहे. जे विज्ञान तंत्रज्ञान आणि गुन्हेगारीने यांचे मिश्रण करते. गुन्ह्याची उकल करण्यास निर्दोषना संरक्षण मिळावे आणि न्याय मिळेल त्याची खात्री करण्यात ते महत्वपूर्ण भूमिका बजावतात.

 आज आपण फॉरेन्सिक सायन्स म्हणजे काय बघितलं पुढच्या वेळी फॉरेन्सिक सायन्स कसे काम करते ??? हे आपण पाहू आणि तुम्हाला सुद्धा त्याचा आनंद मिळेल.

 फॉरेन्सिक सायन्स मध्ये जर तुम्हाला खरोखर आवड असेल तर आम्हाला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.

FROM,
DRUSHTI FORENSIC LAB, KOLHAPUR.
ADDRESS:- NEAR DISTRICT COURT, BEHIND RENUKA MANDIR, ‘GRUHYOG’ APARTMENT, ‘A’WING, SHOP NO’4’, 1ST FLOOR, KASBA BAVDA, KOLHAPUR, MAHARASHTRA, 416006
MOB NO:- 9552912971.
WHATSAPP ANNOUNCEMENTS GROUP:- https://chat.whatsapp.com/DPA6hgzhCq2GF7TUsn7yPh

All reactions:
Sameer N Shaikh and Roshan Thakare

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सायबर क्राईम

क्रिमिनोलॉजिकल टॉक्सिकॉलॉजीचा अभ्यास