फॉरेन्सिक सायन्स कुठे वापरले जाते ??? त्याचा वापर सामान्य माणसासाठी कसा होतो ???

 

फॉरेन्सिक सायन्स कुठे वापरले जाते ??? त्याचा वापर सामान्य माणसासाठी कसा होतो ???

मागील भागामध्ये आपण पाहिलं फॉरेन्सिक सायन्स म्हणजे काय ??? त्यामध्ये आपण वेगवेगळी तंत्रे आणि त्याचा उपयोग कसा होतो. तर आज आपण पाहणार आहोत फॉरेन्सिक सायन्स कुठे वापरले जाते ??? आणि त्याचा वापर सामान्य माणसासाठी कसा होतो ??? फॉरेन्सिक सायन्स सामान्य माणसासाठी कसे मार्गदर्शक बनते. फॉरेन्सिक सायन्सचे गुन्हेगारी नाटक आणि गुप्तहेर कादंबरीसाठी राखीव असलेल्या एक रहस्यमय क्षेत्र आहे. परंतु ते आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक पैलू मध्ये बहुत्व पूर्ण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. फॉरेन्सिक सायन्स कुठे आणि कसे वापरले जाते, हे समजून घेतल्याने आपणाला टेलिव्हिजन वर चालू असलेल्या किंवा तुम्ही पाहिलेल्या वेगवेगळ्या क्राईम मध्ये असणारे वेगवेगळे बारकावे तुमच्या नजरेला येणार नाहीत.



तर मग चला पाहूया आपण, फॉरेन्सिक सायन्स सामान्य व्यक्तीसाठी कसे आणि फॉरेन्सिक सायन्स कुठे वापरले जाते.

गुन्हेगारीचा तपास फॉरेन्सिक सायन्स चा सर्वात प्रसिद्ध वापर हा गुन्हेगारीच्या तपासामध्ये वापरला जातो. ज्याच्यामध्ये एखाद्या ठिकाणी गुन्हा घडलेला असेल, तेथे फॉरेन्सिक तज्ञ येतात आणि तेथील पुरावे उचलतात. ते पुरावे ते केमिकल असतील भौतिक पुरावे असतील बॅलेस्टिक असेल किंवा वेगवेगळे पुरावे सुद्धा असतील. ते सर्व ते उचलतात. तेथे गेल्यावर ते त्याचे फोटो घेतात त्याचे चित्र काढतात आणि सर्व पुरावे वेगवेगळ्या एव्हिडन्स बॅग मध्ये पॅक करता. ते सर्व पुरावे पॅक केल्यावर त्याचे कागदपत्रे सुद्धा करतात. त्यानंतर ते सर्व प्रयोग शाळेत घेऊन गेले जाते आणि तिथे प्रयोग शाळेत गेल्यावर त्याच्यावर ते वेगवेगळ्या प्रकारचे विश्लेषण करतात आणि त्यामधून गुन्हा कसा घडला, त्या गुन्ह्यामध्ये कोण कोण असू शकतात कोण कोणते संशयित आरोपी असू शकते याची ते माहिती देतात आणि न्याय मिळवून देण्यासाठी चोरीपासून खुनापर्यंत प्रकरणे सोडवण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स आवश्यक आहे.

कायदेशीर कारवाई कोट रूम मध्ये फॉरेन्सिक सायन्स गंभीर पुरावे प्रधान करतात. जे केस जिंकूही शकतात किंवा त्या केसला ते खंडित ही करू शकतात. फॉरेनसिक तज्ञ अनेकदा साक्षीदार म्हणून साक्षी देतात. न्यायाधीशांच्या पुढे ते त्यांची बाजू मांडतात आणि न्यायाधीशांना निकाल करण्यासाठी प्रकरण समजून घेण्यासाठी, पुरावे समजून घेण्यासाठी त्यांना ते मदत सुद्धा करतात. फौजदारी खटला असो किंवा दिवाणी खटला असो फॉरेन्सिक सायन्स हे सुनिश्चित करते. ही त्यामध्ये पुरावे चांगले आहेत की नाहीत तसेच त्या पुराव्याच्या आधारे ते त्यांना मदत सुद्धा करतात. त्यामुळे दिवाणी असो किंवा फौजदारी असो त्याच्यामध्ये कायदेशीर प्रक्रियेत फॉरेन्सिक सायन्सचा सुद्धा मोठा हात असतो.


Youtube

 फसणूक आणि आर्थिक गुन्हे सध्या तुम्ही पाहत असाल की 21 व्या युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक गुन्हे घडत आहेत. सायबर फॉर्ड होत आहे. वेगवेगळ्या कंपनीच्या मार्फत पैसे ऑनलाइन गेलेले आहेत असे सुद्धा भरपूर नोंद आहेत. फॉरेन्सिक केवळ सायन्स केवळ हिंसक होण्यासाठी नाही, तर फसवणूक आणि आर्थिक गुन्ह्याच्या तपास करण्यासाठी देखील वापर केला जातो. फॉरेन्सिक मनी लॉन्ड्री आणि वेगवेगळ्या ऑडिटमध्ये त्याचे विश्लेषण केले जाते.

अपघात पुनर्रचना उपयोग अपघातांच्या तपासातही केला जातो, काय घडले आणि कोण जबाबदार असू शकत. हे निर्धारित करण्यासाठी तज्ञ वाहन अपघात, औद्योगिक अपघात आणि विमान आपत्तीचे विश्लेषण करतात. स्पीड मार्क्स, वाहनाचे नुकसान आणि पर्यावरणीय परिस्थितीचे परीक्षण करून फॉरेन्सिक शास्त्रज्ञ कायदेशीर आणि विमा हेतूसाठी मौल्यवान माहिती प्रदान करून अपघातास कारणीभूत असलेल्या घटनांच्या क्रमाची पुनर्रचना करू शकतात.

 फॉरेन्सिक सायन्स हे एक शक्तिशाली साधन आहे जे गुन्ह्याच्या दृश्याच्या पलीकडे जाते. court रूम मध्ये न्याय सुनिश्चित करण्यापासून ते आपल्या आरोग्याचे रक्षण करण्यापर्यंत उपयोगी येते. ते वेगवेगळ्या जीवनातील अनेक पैलूंना स्पर्श करतात. फॉरेन्सिक सायन्स कुठे आणि कसे वापरले जाते. हे समजून घेतल्याने सामान्य लोक त्यांचा समाजावर होणारा परिणाम आणि प्रत्येकासाठी एक सुरक्षित सुंदर जग निर्माण करण्यात त्याची भूमिका बजावू शकतात, असे मला तरी वाटते.

 पुढील भागामध्ये आपण नक्की पाहूया की फॉरेन्सिक सायन्स का वापरले जाते ???

वरील माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की तुमची एक टिपणी देऊन आम्हाला कळवा.

Thank you

FROM,
DRUSHTI FORENSIC LAB, KOLHAPUR.
ADDRESS:- NEAR DISTRICT COURT, BEHIND RENUKA MANDIR, ‘GRUHYOG’ APARTMENT, ‘A’WING, SHOP NO’4’, 1ST FLOOR, KASBA BAVDA, KOLHAPUR, MAHARASHTRA, 416006
MOB NO:- 9552912971.
WHATSAPP ANNOUNCEMENTS GROUP:- https://chat.whatsapp.com/DPA6hgzhCq2GF7TUsn7yPh

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सायबर क्राईम

क्रिमिनोलॉजिकल टॉक्सिकॉलॉजीचा अभ्यास