गुन्ह्याच्या घटनास्थळाची तपासणी

  

                          CRIME SCENE INVESTIGATION


गुन्हाचे ठिकाण हे नेहमी खूप क्रिटिकली असतं. ज्यावेळी एखादी गुन्हा घडतो. म्हणजे एखादा खून होतो, चोरी होते. एखादा मोठा एक्सीडेंट होतो इत्यादी या ठिकाणी सर्वात पहिला आपण पोलीस स्टेशनला फोन करावा. त्यानंतर तेथील पोलीस ऑफिसर व त्यांची टीम घटनास्थळी हजर होते. त्यानंतर त्या घटनास्थळी तेथील मेन पोलीस ऑफिसर मुख्य गुन्ह्याच्या घटनास्थळाची ते पाहणी करतात. 



त्यांना प्रशिक्षण दिलेला असतं की पुरावे कसे उचलावे पुरावे कसे गोळा करावे त्यानंतर ते मुख्य पोलीस ऑफिसर तेथील पुरावे गोळा करतात व ते प्रयोगशाळा म्हणजे न्याय सहाय्यक विज्ञान (FORENSIC LAB) तिकडे पाठवतात.

CRIME SCEAN


घटनास्थळी समजा एखादी चोरी झाली असेल तर ती चोरी हुडकून काढण्यामध्ये पोलीस कसे इन्वेस्टीगेशन करतात ते आपण पाहूया. त्यामध्ये न्याय सहाय्यक विज्ञान कसं मदत करते ते सुद्धा पाहूया समजा एखाद्या ठिकाणी चोरी झाली असेल. तर त्या ठिकाणी सर्वात पहिला पोलीस ऑफिसर येऊन तिथली पाहणी करतात. त्यानंतर ते वेगवेगळ्या लोकांच्याकडून ते माहिती गोळा करतात. त्यानंतर त्या घटनास्थळी कोणाच्या हाताचे ठसे किंवा कोणाच्या पायाचे ठसे मिळतात का ते पाहतात. त्याच बरोबर किती चोरी झालेल्या त्यामध्ये काही सोने चांदी पैसा किंवा मूल्यवान वस्तू चोरीला गेले आहेत का ते पाहतात. सर्व गोळा केलेली माहिती व तेथे फॉरेन्सिक एक्सपोर्ट यांनी येऊन फिंगरप्रिंट किंवा फुट प्रिंट चे नमुने घेतले किंवा गोळा केल्या असतील तर तेथील पुढील इन्वेस्टीगेशन करायला त्याची मदत होते.

फॉरेन्सिक एक्सपोर्ट यांना जर हाताचे ठसे मिळाले असतील किंवा पायाचे ठसे मिळाले असतील तर ते सीसीटीव्ही फुटेज नुसार कोणावर संशय असेल असे संशयित व्यक्तींना ते बोलवून त्यांच्या हाताचे ठसे व पायाचे ठसे घेतले जातात व त्यानंतर त्याची तपासणी करून ते फॉरेन्सिकचा LAB पाठवतात.

घटनास्थळी आपणाला खूप असे वेगवेगळे पुरावे मिळतात. त्या पुरावाचे सुद्धा वेगवेगळे टाईप आहेत तसे मागल्या ब्लॉगमध्ये आपण पाहिलो की जे असे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. तसे वेगवेगळे गुन्ह्याच्या ठिकाणी आपणाला केस,धागा ,रक्त, हाताचे ठसे ,पायाचे ठसे ,घाम त्याचबरोबर एखादे चांगले किंवा एखादी बुलेट असेल वेगवेगळे आपल्याला तेथे सापडतात .त्याची सर्व काही तपासणी करूनच मेन पोलीस ऑफिसर यांना इन्वेस्टीगेशन करायला ते सोयीस्कर होतं .फॉरेन्सिकचा अहवाल हा पोलिसांना खूप मदत करतो .घटनास्थळी कोणतेही पुरावे सापडले तर ते एक्झामिनेशन करून द्यायचं काम हे FORENSIC EXPERT करतात.

CRIME SCENE


 प्रत्येक जिल्ह्याच्या लॅब मध्ये एक असे क्राईम सीनचे डिपार्टमेंट असतं त्या डिपार्टमेंट मध्ये क्राईम सीन वर गेल्यावर सगळ्यात पहिला त्याचे फोटो घेतले जातात .त्यानंतर त्याचे स्केच काढले जातात. त्यानंतर त्याची एव्हिडन्स पुरावे गोळा केले जातात. पुरावे पॅक करून लॅबला पाठवले जातात .घटनास्थळी पूर्णपणे संरक्षण दिलं जातं. त्यानंतर त्या घटनास्थळाची पूर्ण पाहणी एकदा केली जाते. एवढे सगळं काम हे क्राईम म्हणजे घटनास्थळावर केली जाते.फोटोग्राफी वरून आपल्याला नंतर ज्यावेळी आपण परत एकदा घटनास्थळ रिकस्ट्रक करतो त्यावेळी त्या फोटोचा व स्केच आपल्याला उपयोग होत असतो. त्यासाठी फोटोग्राफी व स्केचिंग केलं जातं.

पुराव्याचे फॉरेन्सिक अहवाल मागवला जातो की समजा केस आपल्याला सापडले असेल तर ते केस कोणाचे आहे. माणसाचे आहे की एखाद्या प्राण्याचा आहे. रक्त सापडला असेल तर ते रक्ते का प्राण्याचा आहे की माणसाचा किंवा तिथे एखादे मृत्यू माणूस गावला असेल तर त्या माणसाचे रक्त व जमिनीवर पडलेल्या रक्त हे एकाच व्यक्तीचा आहे किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचा हे पाहिलं जातं. तेथे सापडलेल्या धागा असेल तर तो त्या शर्टावरला आहे किंवा दुसऱ्याचा हे पाहिलं जातं. त्यानंतर तेथे सापडलेले हाताचे ठसे पायाचे ठसे सुद्धा त्याच व्यक्तीचा आहेत किंवा आपणाला सीसीटीव्ही दिसलेले एखादी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीचा हे तपासले जातात.

FINGERPRINT


त्यानंतर येथे सापडलेले काही तर EVIDENCE असतील म्हणजे जसं काही आपल्याला माती सापडले असेल तर ती माती त्यांच्या घराच्या बाहेर असलेल्या गार्डन मधले आहे किंवा नाही हे पाहिलं जातं. असे वेगवेगळे त्या गुन्ह्याच्या तपासणीवर किंवा घटनास्थळी सापडलेल्या EVIDENCE आपल्याला मदत करते आणि या सर्वांवर फॉरेन्सिकचा अहवाल आपल्याला मिळत असतो त्यानुसार घटनास्थळी आपणाला सर्वात मोठा CLUE असतो. आज आपण क्राईम सीन म्हणजे काय  व सापडलेले पुरावे कसे मदत करतात हे पाहिलं पुढच्या वेळी आपण वेगवेगळे पुरावे काय असतात हे पाहूया.

 Social Media Platforms:

Facebook: https://www.facebook.com/Drushti-Forensic-consultancy-103396731551677

Email: - drustiforensiclab@gmail.com

WEB SITE:- First-Class Private Forensic Entity in Western Maharashtra (drushtiforensic.in)

Mobile No:- 9552912971

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सायबर क्राईम

क्रिमिनोलॉजिकल टॉक्सिकॉलॉजीचा अभ्यास